तिरुवअनंतपुरम : मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मृत्यू झालेल्या ६५ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबियांना केरळ सरकारतर्फे ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती स्थानिक प्रशासनमंत्री के. टी. जलील यांनी दिली.याच भागात आणखी एका महिलेवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. त्या महिलेस ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सरकार जलद पावले उचलत आहे, असेही जलील यांनी सांगितले. याच विषयावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी २२ आॅगस्ट रोजी तातडीची बैठक घेतली होती व मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसह अनेक उपायांवर चर्चा केली होती. दरम्यान, कालच कोलम येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. (वृत्तसंस्था)
श्वानदंशाने मृत्यू झाल्यास ५ लाखांची मदत
By admin | Published: August 26, 2016 3:59 AM