नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान सीमेवर सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शिकार झालेल्या नागरिकांना पाच लाखांपर्यंत मदत देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे दिली. तर अतिरेकी आणि माओवादी हिंसाचारपीडितांना दिली जाणारी रक्कम तीन लाखांवरून पाच लाख करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अतिरेकी हल्ले आणि नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱ्यांना आणि सीमेपलीकडील गोळीबार व आयईडी स्फोटात बळी जाणाऱ्यांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये देण्यात येतील.
गोळीबारपीडितांना ५ लाखांपर्यंत मदत
By admin | Published: July 11, 2016 4:13 AM