लघुशंका पीडिताचे आधी पाय धुतले, आता ५ लाखांची मदत; घर बांधण्यासाठीही दिले वेगळे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 03:51 PM2023-07-07T15:51:40+5:302023-07-07T16:37:40+5:30

शिवराज यांनी शाल देत त्याचा सन्मान केला. ते म्हणाले, या घटनेने दु:ख झाले आहे. मी तुमची माफी मागतो.

5 lakhs help from the government to the urine victim, money was also given to build a house from CM Shivrajsingh chauhan in madhya pradesh | लघुशंका पीडिताचे आधी पाय धुतले, आता ५ लाखांची मदत; घर बांधण्यासाठीही दिले वेगळे पैसे

लघुशंका पीडिताचे आधी पाय धुतले, आता ५ लाखांची मदत; घर बांधण्यासाठीही दिले वेगळे पैसे

googlenewsNext

भोपाळ : भाजपच्या माथेफिरू नेत्याने एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केल्यामुळे देशभरातून टीका झाली. त्यानंतर मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीडित तरुणाला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून घेत घरामध्ये आणून खुर्चीवर बसवले, त्यानंतर पाय धुतले, आरती केली आणि तिलकही लावले. आता, या लघुशंका पीडित व्यक्तीला सरकारच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सीधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

शिवराज यांनी शाल देत त्याचा सन्मान केला. ते म्हणाले, या घटनेने दु:ख झाले आहे. मी तुमची माफी मागतो. तुमच्यासारखे लोक माझ्यासाठी देवासारखे आहेत. दुसरीकडे जे झाले ते झाले, असे आदिवासी तरुणाने सांगितले. त्यांनी या तरुणाला यावेळी ‘सुदामा’ हाक मारली आणि म्हणाले की, “दशमत, तू आता माझा मित्र झाला आहेत. यादरम्यान चौहान यांनी त्याच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी प्रवेश शुक्ला याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याच्यावर एनएसए लावण्यात आला असून, तो सध्या तुरुंगात आहे.

मुख्यमंत्र्यांनी पीडित दशमत रावत यांचा सन्मान केल्यानंतर, सीधी जिल्हा कलेक्टर यांनी रावत यांना ५ लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. त्यासोबतच, घर बांधण्यासाठी स्वतंत्रपणे १.५० लाख रुपयांचाही नीधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच हा निधी दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी ट्विटरवरुन सांगितले.  

दोन दलितांना मारहाण

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील दोन दलित तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ही घटना मानवतेसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आरोपींच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात येणार आहे.

पत्नी म्हणाली पैशाचा मोह नाही

शिवराज सिंह चौहान यांनी पीडितेच्या पत्नी सांगितले की,  तुम्हाला घर घ्यायचे आहे, व्यवसायासाठी मदत करायची आहे. यावर पीडितेच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आम्हाला पैशाचा मोह नाही, आमचा माणूस आमच्याकडे पाठवून द्या.

Web Title: 5 lakhs help from the government to the urine victim, money was also given to build a house from CM Shivrajsingh chauhan in madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.