शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अमरनाथ हल्ला, बसचालक सलीमला सोनू निगमकडून 5 लाखांचं बक्षीस

By admin | Published: July 14, 2017 12:37 PM

अमराथ यात्रेला जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यानी सोमवारी हल्ला केला होता. यावेळी बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - अमराथ यात्रेला जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यानी सोमवारी हल्ला केला होता. यावेळी बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. सलीम शेख याने दाखविलेल्या धाडसासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याला 5 लाख रूपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोनू निगमच्या जवळील व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बसचालक सलीमच्या या धाडसावर सोनू निगम प्रभावित झाला आहे. त्यामुळे त्याला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सोनूच्या मते अशा धाडसी व्यक्तींना पुरस्कार मिळालाच पाहिजेत.  मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सोनू सांगतो, अशा धाडशी व्यक्तींना शासनाकडून पदके मिळतात पण त्यांना आर्थिक मदतही मिळायला पाहिजे. अमरनाथ यात्राला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी बसचे टायर फुटल्यानंतरही सलीमनं प्रसंगावधानाचे भान राखत बस सुरक्षित ठिकाणी पोहचवली होती. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले.
सलीम शेख याने दाखविलेल्या धाडसासाठी जम्मू-काश्मीर सरकारने त्याला 3 लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच बसमधील ५० अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या ड्रायव्हरची शौर्यपदकासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा

सोमवारी (11 जुलै ) ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला.
 
लाखाहून अधिक यात्रेकरू
यात्रा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांत जवळचा बलतालहून जाणारा मार्ग व पहेलगामवरून जाणारा पारंपरिक मार्ग अशा दोन्ही मार्गांनी मिळून रविवारी १०,७६३ यात्रेकरूंनी यात्रा पूर्ण केली होती. अशा प्रकारे यंदा यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंची संख्या रविवार रात्रीपर्यंत १,२६,६०४ झाली होती.
 
नियमांचे उल्लंघन 
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.
 
थांबलेली यात्रा रवाना
बुऱ्हाण वणीच्या स्मृतिदिनी दहशतवादी संघटनांनी व फुटीरवाद्यांनी केलेले ‘बंद’चे आवाहन लक्षात घेऊन जम्मूपासून पुढची अमरनाथ यात्रा रविवारी स्थगित करण्यात आली होती. सोमवारी जम्मूच्या बेस कॅम्पपासून तुकड्या बलताल आणि नुनवान पहलगामकडे रवाना झाल्या होत्या. दर्शन घेऊन परतणाऱ्या बलताल व पहेलगाम येथील यात्रेकरूंच्या तुकड्याही परतीच्या प्रवासात जम्मूकडे रवाना झाल्या होत्या. यात्रेकरूंच्या तुकड्यांनी स्वच्छ हवामानात गुंफेपर्यंतचा पुढचा प्रवास सुरू केला होता.
 
१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
 
ही बस गुजरातची
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार ही बस गुजरातची असून, बसचा क्रमांक जीजे-०९-९९७६ आहे. अमरनाथ यात्रा निशाण्यावर असल्याचा इशारा दहशतवाद्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ज्या बसवर हल्ला झाला, ती बस सुरक्षेच्या घेऱ्यातही नव्हती. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली आहे.