शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

प्रशांत किशोर हरवल्याचे काँग्रेसनं लावले पोस्टर्स, शोधणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस

By admin | Published: March 19, 2017 7:06 PM

रणनीतीकार प्रशांत किशोर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर गायब झाले

ऑनलाइन लोकमतउत्तर प्रदेश, दि. 19 - मोदींना 2014च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देणारे आणि बिहारची सत्ता नीतीश कुमारांकडेच राहील अशी रणनीती आखणारे रणनीतीकार प्रशांत किशोर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर गायब झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी चक्क काँग्रेसनं जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. जो कोणी प्रशांत किशोर यांना शोधून देईल त्याला 5 लाखांचं बक्षिस देण्यात येईल, असं या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेस समितीचे सचिव राजेश सिन्हांनीच त्यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. गेल्या वर्षभरापासून प्रशांत भूषण आम्हाला मूर्ख बनवतायत. आम्ही त्यांच्या सूचनांचे पालत करत असतानाही काँग्रेसचा दारुण पराभव का झाला याचे कार्यकर्त्यांना उत्तर हवे आहे, असा मजकूरही या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. मात्र राजेश सिंह यांनी लावलेल्या पोस्टर्सवर काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष राज बब्बर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पराभवाचे खापर दुसऱ्या व्यक्तीवर फोडणे अयोग्य असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांना राज बब्बर यांनी हे पोस्टर्स हटवण्याचे आदेशही दिले आहेत.(प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार)

तत्पूर्वी काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवून देण्याची सर्व धुरा रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर टाकली होती. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी व्यापक रणनीती आखली होती. लखनऊमधल्या वॉर रूममध्ये काँग्रेसच्या विजयाची रणनीती ठरवण्यात आली होती. प्रशांत किशोर टीमच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येक बुथवर जाऊन विश्लेषण केलं होतं. प्रत्येक बुथनुसार जातीयवाद आणि धार्मिक मतांचा आकडा तयार करण्यात आला आहे. तिकीटवाटपातही या मतांना डोळ्यांसमोर ठेवून उमेदवारांना तिकीट देण्यात आलं होतं. प्रशांत किशोर यांची टीम 500 लोकांचं काम करत असल्याचीही चर्चा होती. मात्र आसामसारखी उत्तर प्रदेशातही प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल ठरल्यानं काँग्रेसच्या पदरी अपयश आलं आहे.