नवी दिल्ली - देशातील ८० कोटी गरिबांना दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएमजीकेएवाय) आणखी पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.कोरोनावेळी गरजूंना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्राने २०२० मध्ये ‘पीएमजीकेएवाय’ योजना सुरू केली होती. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत मिळणाऱ्या ५ किलो अनुदानित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य दिले जाते.
आणखी ५ वर्षे मिळणार माेफत अन्नधान्य, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 7:16 AM