श्रीनगर: कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना रविवारी भारतीय लष्कराने कंठस्नान घातले. या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील गस्त आणखीनच वाढवली आहे.दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या श्रीनगर व सीमाभागाचा दौरा केला होता. त्यावेळीही केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत दहशतवादी मारले गेले होते. रमजानच्या पवित्र महिन्यात सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय भारताने जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. केरन सेक्टरमध्ये आज तिसऱ्यांदा पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, तो सुरक्षा दलाने हाणून पाडला.
कुपवाडात घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 10:30 IST