डिप्पी वांकाणी, मुंबईकुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याने इंडोनेशियामध्ये आपले धंदे चालविण्यासाठी इंडोनेशियन महिलेशी लग्न केले होते व त्यातून त्याला मोठे नावही मिळाले होते, असे मुंबई पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. राजनची मालमत्ता पाच हजार कोटींपेक्षाही जास्त असल्याचे मानले जाते. त्याने काहीशी उशिरा झिम्बॉबेमध्ये गुंतवणुकीला सुरवात केली होती. काही दिवसांपूर्वी त्याने तेथे आश्रय मिळविण्याचाही प्रयत्न केला होता परंतु त्यात त्याला काही यश मिळाले नाही. हल्ल्यामध्ये राजनच्या त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांचे गंभीररित्या नुकसान झाल्यानंतर त्याने गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधलेला असू शकतो. या पार्श्वभूमीवर छोटा राजन ताब्यात येणे ही गुप्तचर यंत्रणांची त्याच्यावर कृपाही असू शकते, असे या सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्यावर ७५ पेक्षा जास्त खटले असून मुंबई पोलीस त्याची तीन वर्षांची कोठडी मागू शकतात.राजनच्या दोन्ही मूत्रपिंडांना गंभीररित्या संसर्ग झाला होता त्यामुळे त्याला प्रदीर्घ अशा वैद्यकीय उपचारांची गरज होती. आॅस्ट्रेलियामध्ये छोटा शकील राजनला ठार मारण्याच्या प्रयत्नांत होता व राजनला आपल्याला कोणत्याही विशिष्ट हॉस्पिटलमध्ये किंवा दीर्घ काळ दाखल होता येणार नाही याची त्याला कल्पनाही होती. त्यामुळेच त्याला स्थानबद्ध करण्यात आले असावे. कारण त्याच्यावर उपचार केले जात असताना पोलीस संरक्षण असेल, असे हे सूत्र म्हणाले. दरम्यान, दाऊदबद्दल छोटा राजनकडे माहितीचे जे भांडार आहे त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात आयएसआयने दाऊदच्या हालचालींवर कडक निर्बंध घातले असावेत.
विदेशात ५ हजार कोटींची माया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2015 10:07 PM