शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

राष्ट्रपतींना भेटण्यासाठी ५ बेरोजगारांची १५०० किमी पायपीट; स्वतंत्र राज्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:46 AM

स्वतंत्र मयूरभंज राज्यासाठी कडाक्याच्या थंडीत ३ रात्री बसस्थानकावर मुक्काम

नवी दिल्ली - एखादी मागणी लावून धरण्यासाठी किती पाठपुरावा करावा, किती त्रास सहन करावा, याचे उदाहरण आसाममधील पाच बेरोजगार युवकांनी घालून दिले आहे. आसाममधून मयूरभंज हे स्वतंत्र राज्य तयार करावे, ही मागणी प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींना साकडे घालण्याचे ठरवले आणि मग सुरू झाला त्यांचा १५०० किलोमीटरचा प्रवास. ‘चलो दिल्ली’ म्हणत त्यांनी ४७ दिवस पायी चालत राजधानी गाठली; परंतु येथे आल्यानंतर त्यांना ३ रात्री बसस्थानकावरच काढाव्या लागल्या, तेही कडाक्याच्या थंडीत!

रोज ३५ किमी पायपीट‘आम्ही सलग ४७ दिवस १५०० किलोमीटरहून अधिक चालत इथपर्यंत पोहोचलो आहोत. रोज किमान ३५ किमी चालायचो. जिथे जागा मिळेल तिथे रात्र काढायचो,’ असे या बेरोजगारांतील सुकुलाल मरांडी यांनी सांगितले. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म मयूरभंजमधील वरबेडा गावातील आहे.

राष्ट्रपती भेटत नाहीत तोपर्यंत जाणार नाही‘राष्ट्रपती भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही परतणार नाही. मयूरभंजला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा, अशी आमची मागणी आहे,’ असा निर्धार सुकुलाल यांनी व्यक्त केला. सुकुलाल यांच्याबरोबर आलेले करुणाकर सोरेन सांगतात, ‘आम्ही या बसथांब्यावर ३ दिवस आणि ३ रात्री कुडकुडत राहिलो आहोत. इंडिया गेटसमोर एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, तिथे अंघोळ करत होतो.’

...आणि २ खोल्यांची व्यवस्था झाली

दिल्लीतील बडोदा बसस्थानकात सुकुलाल आणि त्याचे साथीदार रात्री १२ अंश सेल्सिअस तापमानात झोपले. १९ फेब्रुवारी रोजी मयूरभंज खासदारांच्या विश्रामगृहात त्यांना दोन खोल्या मिळाल्या. आम्हाला राष्ट्रपती भवनातून फोन आला. प्रोटोकॉलमुळे वेळ लागणार आहे, असे तरुणांनी सांगितले.

असा मिळाला ई-मेलसुकुलाल म्हणतात, ‘आम्ही हा प्रवास १ जानेवारीला सुरू केला. आम्ही २ फेब्रुवारीला राष्ट्रपतींना भेटण्यासाठी त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर मेल पाठवला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कळवले होते. राष्ट्रपतींच्या भेटीचा उद्देशही सांगितला. त्यानंतर त्यांनी केंद्रीय आणि जिल्हा गुप्तचर विभागाला माहिती दिली. या विभागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला राष्ट्रपतींचा ई-मेल पत्ता दिला. आम्ही सतत अधिकाऱ्याच्या संपर्कात होतो. आता इथपर्यंत पोहोचलो; परंतु आम्हाला बसथांब्यावर रात्र काढावी लागली. असे काही होईल असे वाटले नव्हते.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू