चाकूहल्ला करून लुटणार्यास ५ वर्ष कारावास न्यायालयाचा निकाल : एप्रिल २०१५ मध्ये मेहरूण परिसरात घडली होती घटना
By admin | Published: August 31, 2016 9:44 PM
जळगाव : चाकूहल्ला करून एकाकडून ५०० रुपये जबरीने लुटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी मुश्ताक उर्फ काल्या अब्बास शेख (रा.फुकटपुरा, तांबापुरा परिसर, जळगाव) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
जळगाव : चाकूहल्ला करून एकाकडून ५०० रुपये जबरीने लुटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी मुश्ताक उर्फ काल्या अब्बास शेख (रा.फुकटपुरा, तांबापुरा परिसर, जळगाव) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.मेहरूण परिसरात १६ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपी मुश्ताक शेख याने अय्युब शेख (रा.मेहरूण, जळगाव) याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून पैशांची मागणी केली होती. त्यास नकार दिल्याने मुश्ताकने अय्युबवर चाकूने वार करत त्याच्या खिश्यातून ५०० रुपये जबरीने काढून घेतले होते. या प्रकारानंतर अय्युबने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुश्ताकविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३९२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जगदीश देवरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.६ साक्षीदार तपासलेहा खटला न्यायाधीश ए.के. पटणी यांच्या न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षातर्फे ॲड.चारुलता बोरसे यांनी ६ साक्षीदार तपासले होते. परिस्थितीजन्य पुरावे व ॲड.बोरसे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्रा धरत न्यायालयाने आरोपी मुश्ताकला भादंवि कलम ३९२ नुसार ५ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड; दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. आरोपीतर्फे ॲड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.