पोलीस पाटील पदासाठी ५० जणांच्या मुलाखती
By admin | Published: March 23, 2016 12:11 AM
जळगाव : तालुक्यातील २३ गावांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर मंगळवारी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी ५२ उमेदवारांना तोंडी परीक्षेसाठी बोलविले होते. या दरम्यान ५० जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. बुधवारी जामनेर तालुक्यातील ४० गावांसाठी होणार्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे.
जळगाव : तालुक्यातील २३ गावांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर मंगळवारी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी ५२ उमेदवारांना तोंडी परीक्षेसाठी बोलविले होते. या दरम्यान ५० जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. बुधवारी जामनेर तालुक्यातील ४० गावांसाठी होणार्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे.मराठा समाजाचा २७ रोजी वधूवर मेळाचाजळगाव : मराठा समाज राज्यस्तरीय वधूवर सूचक केंद्रातर्फे २७ मार्च रोजी खान्देश मराठा पाटील समाजाचा वधूवर परिचय मेळावा नूतन मराठा महाविद्यालयात होत आहे. मेळाव्यास जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना गौरवपत्र प्रदान करण्यात येणार आहे. मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन संतोष सूर्यवंशी, सुनील गरूड, गणेश अहिरराव यांनी केले आहे.