नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार कारागृहात बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये अर्थात कोरोना काळात दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत (DSSB) तिहारमध्ये विविध पदांवर भरती करण्यात आली होती. बायोमेट्रिक पद्धतीने ही भरती करण्यात आली होती. मात्र, अवैध पद्धतीने ही भरती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
दरम्यान, भरती झाल्यानंतर अधीनस्थ सेवा निवड मंडळाने पडताळणी केली असता सर्वप्रकार उघडकीस आला. ५० कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. मग सेवा समाप्तीची सूचना म्हणून ३० नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.
५० कर्मचारी निलंबिततिहार तुरुंगातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३९ वॉर्डन, ९ सहाय्यक अधीक्षक आणि २ मॅट्रॉनचा समावेश आहे. DSSSB चा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आता तिहार तुरुंगात विविध पदांवर अवैध पद्धतीने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.