शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गौण खनिज चोरांकडून ५० लाखांचा दंड वसूल २२ दिवसातील कारवाई : जळगाव तालुक्यातून ९ लाखांचा दंड

By admin | Published: December 23, 2015 12:17 AM

जळगाव : वाळू वाहतुकीला बंदी असताना चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या तसेच विनापरमिट गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या ३३७ वाहनधारकांकडून तहसीलदारांनी महिनाभरात तब्बल ५० लाख ६१ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जळगाव : वाळू वाहतुकीला बंदी असताना चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या तसेच विनापरमिट गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या ३३७ वाहनधारकांकडून तहसीलदारांनी महिनाभरात तब्बल ५० लाख ६१ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्‘ातील गिरणा, तापी यासह अन्य नदीपात्रातील वाळूच्या लिलावाची सप्टेंबर महिन्यात मुदत संपली. त्यानंतर वाळूची चोरटी वाहतूक सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने परवानगी नसताना वाळूची चोरटी वाहतूक करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तहसीलदारांनी पथक तयार करीत कारवाईला वेग दिला. यात विनापरमिट खडी, डबर, मुरुम व मातीची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हाभरातील तहसीलदारांनी १ ते २२ डिसेंबर या कालावधित तब्बल ३३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
जळगावात सर्वाधिक कारवाई
सर्वाधिक कारवाई जळगाव तहसीलदारांनी केली. ४६ वाहने ताब्यात घेतली. त्यात ९ लाख २८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे. तर सर्वात कमी कारवाई ही अमळनेर तहसीलदारांनी केली आहे. या तालुक्यात केवळ पाच वाहनांवर कारवाई करून ४२ हजार ५२० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
अवैध गौण खजिन वाहतूकदारांविरुद्ध दंडात्मक कारवाईसोबतच काही तहसीलदारांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात जळगाव तहसीलदारांनी एक, जामनेर तहसीलदारांनी एक, पाचोरा व अमळनेर तहसीलदारांनी प्रत्येकी दोन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चौकट
तालुकावाहने कारवाई
जळगाव४६९२८५००
चोपडा३६५०७६००
यावल२८४९०८१०
भुसावळ२७४५९४००
रावेर५३४५०५००
भडगाव२२३८८६३०
बोदवड१७३३१३२५
पाचोरा२३३१२१६०
जामनेर१८३१०८००
चाळीसगाव२८३०६३९०
एरंडोल११२०९४००
धरणगाव०७१७७०००
पारोळा०४८१६००
मुक्ताईनगर१२६४८४०
अमळनेर०५४२५२०
एकुण३३७५०६१४७५