नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. देशात बेकारीचे प्रमाण दुप्पट होऊन ते ६ टक्के झाले, असा निष्कर्ष अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल एम्प्लॉयमेन्टने अहवालात काढला आहे.नोटाबंदीच्या काही महिने आधी एप्रिल, २०१६मध्ये ग्रामीण पुरुष कामगारांचे प्रमाण ७२ टक्के होते, ते डिसेंबर, २०१८मध्ये ६८ टक्क्यांवर घसरले. याच कालावधीत शहरांतील पुरुष कामगारांचे प्रमाण ६८ टक्क्यांवरून ६५ टक्के झाले.उच्चशिक्षण घेतलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना रोजगार हवा आहे, पण सरकारी नोकऱ्यांच्या संधी कमी आहेत. खासगी क्षेत्रात विकास व रोजगाराच्या संधी यांचाही ताळेबंद बसत नाही. यास नोटाबंदी व जीएसटी हे कारण आहे. नोटाबंदीने रोजगाराच्या संधी नष्ट झाल्या. ती पोकळी भरून निघालेली नाही.>शहरी हमी योजना हवीरोजगाराच्या संधी नष्ट झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील २० ते २४ वर्षे वयोगटांतील युवकांना बसला. ग्रामीण भागातील १५ ते २९ वर्षे वयात बेकारीचे प्रमाण ८० टक्के तर शहरांत ७७ टक्के आहे. बेकारीचा अर्थव्यवस्था व समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यावर मनरेगाप्रमाणे शहरांत वर्षाला किमान शंभर दिवस रोज ५०० रुपये रोजगाराची हमी देणारी शहरी रोजगार हमी योजना राबवावी, असा उपाय अहवालात सुचविला आहे.
नोटाबंदीमुळे ५० लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:49 AM