आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसने उदयपूर नव संकल्प शिबिरात ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना ५० टक्के स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बहुतांश युवा नेत्यांना अपेक्षा होती की, राज्यसभेच्या निवडणुकीतही ५० टक्के प्रतिनिधित्व दिले जाईल. तथापि, काँग्रेस श्रेष्ठींच्या निकटवर्ती सूत्रांनुसार हा निर्णय सध्या फक्त संघटनात्मक स्तरावरच लागू केला जाणार आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याच्या ११ जागा आहेत.
सूत्रानुसार, तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारिणी ते अखिल भारतीय काँग्रेस समितीत ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवा नेत्यांना ५० टक्के प्रतिनिधित्व दिले जाईल. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून हाेईल युवा नेत्यांना राज्यसभा निवडणुकीतही ५० टक्के प्रतिनिधित्व मिळण्याची आशा होती.
हे नेते जाणार राज्यसभेवरकाँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ, रागिणी नायक, जयवीर शेरगिल, राष्ट्रीय सचिव वीरेंद्र सिंह राठौड, धीरज गुर्जर यांनाही असेच वाटत होते; परंतु, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद, जयराम रमेश, अजय माकन, डॉ. अजय कुमार, संजय निरुपम, पी. चिदंबरम, रणदीप सिंह सुरजेवाला, भंवर जितेंद्र सिंह यांना राज्यसभेवर पाठविले जाणार आहे.