५० टक्के मनरेगा लाभार्थ्यांना मजुरीसाठी द्यावी लागते लाच!
By admin | Published: August 03, 2015 10:26 PM
नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. खुद्द सरकारने सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली.
नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. खुद्द सरकारने सोमवारी राज्यसभेत ही माहिती दिली.एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी याबाबत कबुली दिली. नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ पब्लिक फायनान्स ॲण्ड पॉलिसी(एनआयपीएफपी)ने काही दुय्यम पाहणीच्या आकडेवारीनंतर उपरोक्त दावा केला होता. मात्र या दाव्याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असे भगत म्हणाले. एका अहवालानुसार, मनरेगाच्या ५० टक्के लाभार्थ्यांना आपली मजुरी वसूल करण्यासाठी लाच द्यावी लागते, याबाबत सरकारला माहिती आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.