अंबरनाथ: कोरोनाचा कहर वाढत असल्याने आता भारत सरकारने विदेशातील प्रवाशांनाही र्निबध घातले आहेत. त्याचा फटका हा फिलीपायीन्समध्ये शिकण्यासाठी गेलेल्या 50 विद्याथ्र्यानाही बसला आहे. या विद्याथ्र्यानी फिलीपायीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणा-या विमानात बसविण्यात येत नाही. त्यामुळे भारतात येण्याची इच्छा असतांनाही हे 50 विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. त्यातील एक विद्यार्थीनी अंबरनाथची असुन तीच्या पालकाने या विद्याथ्र्याना भारतात सुखरुप आणन्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.
कोराना वायरसमुळे अंबरनाथची नेहा पाटील ही विद्यार्थीनी आणि तीच्या सोबतचे भारतातील तब्बल 50 विद्यार्थी हे सिंगापूर विमानतळावर अडकले आहेत. नेहा आणि तीच्या सोबतचे इतर विद्यार्थी हे फिलीपायीन्समध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र फिलीपायीन्समध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या विद्याथ्र्यानी त्या देशातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच त्या सरकारनेही त्यांना स्वदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला.
फिलीपायीन्स मधील मनिला विमानतळावरुन थेट भारतासाठी विमान नसल्याने मनिला ते मलेशिया आणि नंतर मलेशिया ते भारत असा त्यांचा प्रवास होणार होता. त्यानुसार ते 17 मार्चला मनिलाहुन मलेशियात दाखल झाले. मात्र मलेशिया सरकारने त्यांच्या देशातुन थेट भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट करित त्यांना थेट सिंगापूरला पाठविण्यात आले. सिंगापूरहुन एयर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. 18 मार्च रोजी सकाळी त्यांचा प्रवास होणो अपेक्षित होते. मात्र सिंगापूर सरकारला मिळालेल्या आदेशानुसार त्यांना सिंगापूरहुन भारतात पाठविता येणार नाही असे स्पष्ट केले.
सिंगापूरहुन भारतात प्रवेश बंदी केल्याने हे विद्यार्थी सिंगापूरच्या विमानतळावरच अडकुन पडले आहेत. या विद्याथ्र्यानी आप आपल्या पालकांना त्याची कल्पना दिली. अखेर ही माहिती मिळताच अंबरनाथची विद्यार्थीनी नेहा हीचे वडील राजू पाटील यांनी लागलीच या प्रकरणी शासकीय यंत्रणोसोबत पाठपुरावा सुरु केला आहे.
‘‘ फिलीपायीन्समधील प्रीज्वल हेल्थ सिस्टीम डाटा या कॉलेताच एमबीबीएसच्या तृतीय वर्षात नेहा शिकत होती. तीच्या सोबतचे विद्यार्थी देखील त्याच देशात शिकण्यासाठी गेले होते. त्या सर्व विद्याथ्र्याना भारतात आणने गरजेचे आहे. तसेच त्यांची प्राथमिक तपासणी त्यांनी स्वत:च केली आहे. हे वैद्यकिय शिक्षण थेत असल्याने त्यांना त्याची जाणिव आहे. अजुनही एकही विद्यार्थी कोरोनाचा बाधित नाही. त्यामुळे भारत सरकारने त्या विद्याथ्र्याना लागलीच भारतात आणावे अशी मागणी आपण केली आहे.- राजू पाटील, वडील.