शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

ममतांचे कार्टून शेअर करणाऱ्या प्राध्यापकास ५० हजार भरपाई

By admin | Published: March 10, 2015 11:21 PM

वर्ष २०१२ चा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी

कोलकाता : वर्ष २०१२ चा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे एक व्यंगचित्र इंटरनेटवर टाकल्याबद्दल अटक केले गेलेले जादवपूर विद्यापीठाचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक अंबिकेश महापात्र यांना पश्चिम बंगाल सरकारने ५० हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.प्रा. महापात्र यांनी त्यांना इतर कोणाकडून तरी मेलवर आलेली ममता बॅनर्जी व त्यांचे त्यावेळचे विश्वासू मुकुल राय यांची व्यंगचित्रे काही जणांना ‘फॉरवर्ड’ केली होती. ममतांचे ते व्यंगचित्र सत्यजित रे यांच्या ‘सोनार केल्ला’ (सुवर्ण किल्ला) या चित्रपटातील पात्रावर बेतलेले होते. प्रा. महापात्र यांनी यासाठी ज्या कॉम्प्युटरचा वापर केला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस त्यांच्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुब्रत सेनगुप्ता यांच्या नावावर नोंदलेला होता. दक्षिण कोलकत्यातील जादवपूर पूर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यावरून माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली महापात्र व सेनगुप्ता यांना एप्रिल २०१२ मध्ये अटक केली होती.(वृत्तसंस्था)