नोएडा - ग्रेटर नोएडातील कोतवालीतील कासना परिसरात मंगळवारी एका खासगी बँकेच्या एटीएममधून 500 रुपयांची बनावट नोट बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममधून तीन जणांनी पैसे काढले तेव्हा 500 रुपयाच्या एकूण 7 बनावट नोटा बाहेर आल्या. शिवाय, काही नोटा फाटलेल्या स्थितीही होत्या व काहींचा रंगदेखील उडालेला होता. या प्रकारावर नाराजी व्यक्त तिघांनी गोंधळ घातला व पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप या तीन जणांनी केला आहे. या तिघांनी कस्टमर केअरलादेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तेथेही संपर्क होऊ शकला नाही.
दिल्लीच्या एटीएममधून बाहेर आली दोन हजारांची अर्धी नोटयाआधी दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली. एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढालया गेला असताना त्याला एटीएममधून दोन हजारांची अर्धी नोट मिळाली. दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शादाब डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता. कोणीतरी फाटलेल्या नोटेला कागद जोडल्याचे शादाबला तेथे दिसून आलं. शादाबने एटीएममधू दहा हजार रूपये काढले होते. या दहा हजारांपैकी एक दोन हजार रूपयांची नोट खोटी बाहेर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद शादाब या व्यक्तीचं येस बँकेत खातं आहे. एटीएममधून खोटी नोट बाहेर आल्यावर मी त्या संदर्भातील तक्रार ग्राहक सेवा अधिकाऱ्यांकडे केली. पण अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने मी पोलिसात तक्रार दाकल केल्याचं मोहम्मद शादाब यांनी सांगितलं.