शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

गुजरातमध्ये 500 डॉक्टरांचा भाजपमध्ये प्रवेश; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 11:04 AM

500 doctors join BJP ahead of assembly polls in Gujarat : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील  यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे.  2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील जवळपास 500 डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील  यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये डॉक्टरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत भाजप जास्त सतर्क आहे. 4 मे पासून पुढील 6 महिने न थांबता काम करण्याच्या सूचना पक्षाने कार्यकर्त्यांना आधीच दिल्या आहेत. याआधी नुकत्याच 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या असून त्यापैकी 4 राज्यांमध्ये भाजपची लाट आली आहे. भाजपने कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेसाठी मोठी तयारी करण्यास सांगितले आहे.

'4 मे पर्यंत कोणताही कार्यक्रम आयोजित नाही'आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय राहावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही 1 मे ते 4 मे या कालावधीत कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण 1 मे ही सार्वजनिक सुट्टी होती. यानंतर कार्यकर्ते गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. पुढील 6 महिने सर्व कार्यकर्त्यांनी न थांबता काम करायचे आहे, कारण आम्हाला आमचे सर्वश्रेष्ठ देण्याची गरज आहे, असे गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी म्हटले आहे. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा गुजरात दौऱ्यावर गुजरातमध्ये आधीच निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन महिन्यात गुजरातचे दोन दौरे केले आहेत. त्यांच्या दौऱ्यानंतर गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच, येत्या काही महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा गुजरातच्या दौऱ्यावर येणार आहेत. वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांनी देखील गुजरात राज्याचा दौरा केला आहे. गुजरातमध्ये केवळ राज्य आणि केंद्रीय राजकारणी आले नाहीत तर परदेशातील मोठ्या व्यक्ती आल्या आहेत,  ज्यामध्ये युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांचा समावेश आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरातचा दौरा केला आहे.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी