केंद्र सरकार विदेशात राहणाऱ्या भारतीयांना जोडण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहे. अशातच हे वास्तव पुढे आले आहे की, दरवर्षी १.८० लाख जण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विदेशात स्थायिक होत आहेत.
११ वर्षांत १६ लाखांहून अधिक जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले. हे प्रमाण दररोज सरासरी ४०० इतके होते. २०२१ व २०२२ मध्ये हा वेग वाढला आहे. आता हे प्रमाण दिवसाला सरासरी ५०० इतके आहे.
देश सोडण्याचे कारण काय?
- देशात वाढणारे अपराध व व्यवसायासाठी कमी संधी
- महिला व मुलांसाठी सुरक्षित वातावरण हवे
- आधुनिक जीवनशैली आणि प्रदूषणमुक्त हवा
- कमाईच्या अधिक संधी आणि कमी कर
- परिवारासाठी चांगल्या आरोग्य सुविधा
- मुलांच्या भविष्यासाठी
देशाचे काय होतेय नुकसान?
- श्रीमंत उद्योपतींनी बस्तान देशाबाहेर हलवल्याने नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे.
- कर वाचविण्यासाठी उद्योगपती भारत सोडतात. त्यामुळे संकलनावर प्रतिकूल परिणाम.
ब्रेन ड्रेन : एका पाहणीनुसार, १९९६ ते २०१५ या काळात बोर्ड परीक्षांमधील निम्म्याहून अधिक टॉप रँकर्स नोकरी-व्यवसायासाठी देशाबाहेर गेले आहेत व तिथेच स्थायिक झाले आहेत. या हुशारीचा देशाला काहीही उपयोग होत नाही.
किती जणांनी देश सोडला?२०११ १,२२,८१९२०१२ १,२०,९२३२०१३ १,३१,४०५२०१४ १,२९,३२८२०१५ १,३१,४८९२०१६ १,४१,६०३२०१७ १,३३,०४९२०१८ १,३४,५६१२०१९ १,४४,०१७२०२० ८५,२५६२०२१ १,६३,३७०२०२२* १,८४,७४१ (*३१ ऑक्टोबरपर्यंत)(स्रोत : सरकारने लोकसभेत दिलेली माहिती)