नवी दिल्ली -दिल्लीपोलिसांच्या सायबर सेलने अश्लीलता आणि द्वेष पसरवणाऱ्या जवळपास 500 वैबसाइट्स बंद केल्या आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम प्रीव्हेंशन अगेंस्ट वुमन अँड चिल्ड्रन (सीसीपीडब्लूसी) आणि सायबर सेलला मिळालेल्या तक्रारींवरून कारवाई करत, गेल्या 18 महिन्यांत जवळपास 50 सायबर गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी काही वेबसाईट्सविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात अनेक सोशल मीडिया पोस्टच्या यूआरएलचाही समावेश आहे. हे सर्व इतर देशांतील बंदी घालण्यात आलेल्या संघटनांकडून चालवले जात आहे.
स्लीपर सेलच्या मदतीने असे हजारो अकाउंट्स करण्यात आले आहेत तयार -या बंदी असलेल्या संघटनांनी स्लीपर सेलच्या मदतीने सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने असे अकाउंट्स तयार केले आहेत. या अकाउंट्सच्या माध्यमाने आक्षेपार्ह, देशविरोधी आणि समाजात द्वेष पसरवणरी माहिती पसरवली जाते. असे अकाउंट्स शोधून ते बंद करण्याची कारवाई सायबर सेल कडून केली जात आहे.
सायबर सेलला सातत्याने सोशल मीडियावर लक्ष ठेवावे लागते -सायबर सेलचे डीसीपी अनेश रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह सोशल नेटवर्किंग साइट्स बंद कराण्यासाठी, काही दिवसांच्या अंतराने संबंधित सोशल नेटवर्कच्या संचालकांच्या सोबतीने कारवाई केली जाते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि यासाठी सायबर सेलला सातत्याने सोशल मीडियावर लक्ष ठेवावे लागते.
18 महिन्यांत 500हून अधिक यूआरएल बॅन -गेल्या 18 महिन्यांत अशा प्रकारच्या 500हून अधिक यूआरएल बॅन करण्यात आल्या आहेत. तसेच यांच्याशी संबंधित जवळपास 50 आरोपींवर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारची प्रकरणे, आरोपींना अटक करणे आणि पुढील कायदेशीर कारवाई, ही पूर्णपणे तक्रार करत्यावर अवलंबून असते.
महत्त्वाच्या बातम्या -
व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम
CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण