दिल्लीराजधानी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील तब्बल ५ हजार नर्स संपावर गेल्या आहेत. यात महिला आणि पुरूष अशा दोन्ही कामगारांचा समावेश आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. ऐन कोरोनाच्या काळात कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. रुग्णांना समस्यांना तोंड द्यावं लागत असून त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणी नसल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, ओपीडी आणि आपत्कालीन वॉर्डात अद्याप याचा परिणाम झालेला नाही. पण कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास संपूर्ण रुग्णालय प्रशासन व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.
संपावर गेलेल्या नर्स आणि वॉर्ड बॉय यांच्या मागण्याची यादी खूप मोठी आहे. यात ६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. या त्रृटी दूर झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनात वाढ होईल. राहण्याची व्यवस्था, कंत्राटी पद्धतीनं केली जाणारी नियुक्ती थांबवणं अशाही काही मुख्य मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.
६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करासंपावर गेलेल्या नर्स आणि वॉर्ड बॉय यांची मुख्य मागणी ६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करण्याची आहे. त्यामुळे मासिक मानधनात वाढ होईल, असं संपकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्मचारी संघटनांनी एकूण २३ मागण्या केल्या होत्या आणि एम्सचे व्यवस्थापक, सरकारने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत, अशी माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली.
कंत्राटी पद्धत बंद कराकंत्राटी पद्धतीने नर्सेसची भरती करणं बंद व्हायला हवं अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या जे कंत्राट पद्धतीने कामावर आहेत त्यांना कायमस्वरुपी करुन घ्यावं अशीही मागणी करण्यात आली आहे.
नर्सिंग सुविधांचे आऊटसोर्सिंग बंद करादिल्लीतील एम्सच्या नर्स यांनी रुग्णालयातील नर्सिंग सुविधांचे आऊटसोर्सिंग बंद करण्याचीही मागणी केली आहे. रुग्णालयातील रुग्णांना बाहेरच्या कंपनीच्या भरवशावर सोडून देणं योग्य नाही, अशी नर्सेस संघटनेचं म्हणणं आहे. सध्या नर्सेस संपावर असतानाही रुग्णालय प्रशासनाने बाहेरुन कर्मचारी मागवले असल्याचंही कर्मचारी संघटनेने सांगितलं.
राहण्याची व्यवस्थारुग्णालयात विविध शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी नर्सेस ठेवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था देखील रुग्णालयाने करायला हवी, अशी मागणी नर्सेसने केली आहे.