काँग्रेसला मोठं भगदाड पडणार; गुलाम नबींच्या समर्थनार्थ 5000 कार्यकर्ते पक्ष सोडणार! AAP लाही मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:11 PM2022-08-31T21:11:55+5:302022-08-31T21:12:42+5:30
बुधवारी जम्मू-काश्मीरमधील आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनीही पक्ष सोडला असून आझादांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर गुरुवारी काँग्रेसचे तब्बल 5 हजार कार्यकर्ते पक्ष सोडून आझादांना पाठिंबा देणार आहेत. यावरूनच गुलाम नबी आझादांचा जम्मू-काश्मीरच्या राजकारणावर असलेला प्रभाव दिसून येतो.
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडून अद्याप एक आठवडाही झालेलाना नाही, तोच आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर, आतापर्यंत काँग्रेसच्या 100 हून अधिक नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकून आझादांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरमधील आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनीही पक्ष सोडला असून आझादांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर गुरुवारी काँग्रेसचे तब्बल 5 हजार कार्यकर्ते पक्ष सोडून आझादांना पाठिंबा देणार आहेत. यावरूनच गुलाम नबी आझादांचाजम्मू-काश्मीरच्या राजकारणावर असलेला प्रभाव दिसून येतो.
गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्टला काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्यांतून गुलाम नबींच्या राजीनाम्याने पक्षाला काही फरक पडत नाही, असे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आझादांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये फूट पडू लागली आहे. यामुळे काँग्रेसला प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये फटका बसताना दिसत आहे. देशाच्या राजकारणात आधीच गळती लागलेल्या काँग्रेससाठी हा मोठा आघात आहे.
काँग्रेसचे 5000 कार्यकर्ते आझादांना देणार समर्थन -
मिरर नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ गुरुवारी उरी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमधील 5000 काँग्रेस कार्यकर्ते सामूहिकपणे पक्षाचा राजीनामा देणार देत आझाद यांना पाठिंबा देणार आहेत. यापूर्वी बुधवारी काँग्रेसच्या 42 नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत आपण आझाद यांच्या पक्षात जाणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच, आझाद यांनी आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे 100 हून अधिक नेते आपल्यासोबत जोडले आहेत. तसेच, ते उद्याही हजारो कार्यकर्त्यांना आपल्यासोबत जोडणार आहेत.
आप कार्यकर्त्यांनीही दिलं आहे समर्थन -
यापूर्वी बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनी पभाचा राजीनामा देत आझादांना समर्थन दिले आहे.