शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

पेंटिंग, आर्ट, दगडी शिल्प... संसदेच्या नवीन इमारतीमध्ये असणार 5 हजार वर्षांचा सनातन परंपरेचा इतिहास; प्रत्येक प्रवेशद्वाराचे आहे खास वैशिष्ट्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:15 PM

New Parliament Building : पेंटिंग, डेकोरेटिव्ह, भिंतीचे फलक, दगडी शिल्पे आणि धातूच्या वस्तूंचा समावेश संसद भवनाच्या नवीन इमारतीत करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. इमारतीचे सुशोभिकरण, इतर सजावट, बाग फुलविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, संसद भवनाच्या नव्या इमारतीत भारतीय संस्कृतीचे 5,000 वर्षांचे चित्रण असणार आहे. सनातन परंपरेतील सुमारे 5,000 कलाकृती आणि वास्तू कला, यासाठी तयार करण्यात आल्या आहे. पेंटिंग, डेकोरेटिव्ह, भिंतीचे फलक, दगडी शिल्पे आणि धातूच्या वस्तूंचा समावेश संसद भवनाच्या नवीन इमारतीत करण्यात येणार आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नवीन इमारतीच्या सहा प्रवेशद्वारांवर शुभ प्राण्यांची शिल्पे लावण्यात येणार आहेत. हे शुभ प्राणी भारतीय संस्कृतीतील त्यांचे महत्त्व, वास्तुशास्त्र आणि बुद्धी, विजय, सामर्थ्य आणि यश यासारख्या गुणांवर आधारित निवडले गेले आहेत. ज्ञान, संपत्ती, बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती दर्शवणारी गज (हत्ती) ची मूर्ती उत्तर प्रवेशद्वारावर बसविण्यात येणार आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वारावर गरुड आहे, जो लोकांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. ईशान्येकडील प्रवेशद्वारावर एक हंस आहे, जो विवेक आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करतो.

संसद भवनाच्या नवीन इमारतीचे लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या नवीन इमारतीमध्ये स्वातंत्र्यलढ्याला समर्पित असलेले सहा ग्रॅनाईट पुतळे आणि संविधान निर्मितीत सहभागी असलेल्या व्यक्तिमत्त्वांचाही समावेश असणार आहे. याशिवाय, दोन सभागृहांसाठी प्रत्येकी चार गॅलरी, तीन औपचारिक उपकक्ष आणि एक संविधान गॅलरी असणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनासाठी स्टोअरमधील कोणतीही कलाकृती वापरण्यात आली नाही. नवीन इमारतीच्या भिंतींना सुशोभित करणारी सर्व कलाकृती पुनर्संचयित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एक हजाराहून अधिक कारागीर आणि कलाकारांचा सहभाग असल्याचे सुत्रांनी सांगितले. एका सूत्रानुसार, देशभरातील स्थानिक आणि तळागाळातील कलाकारांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, कारण संसद ही देशातील लोकांची आहे आणि त्यांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. तसेच, अधिकाऱ्याने सांगितले की, या कलाकृती भारतीय संस्कृती आणि सभ्यता आणि संस्कृती या दोन्हींशी संबंधित ओळख दर्शवतील.

नवीन इमारतीच्या आत प्रत्येक भिंतीवर आदिवासी आणि महिला नेत्यांचे योगदान यासारख्या विशिष्ट पैलूचे चित्रण करणारी थीम असणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या इमारतीमध्ये भारतीय संस्कृतीचे 5 हजार वर्ष उलगडले जातील. यासोबतच भारतीय ज्ञान परंपरा, भक्ती परंपरा, भारतीय वैज्ञानिक परंपरा तसेच स्मारकांवर पुरेसे लक्ष दिले जाईल. संसद भवनाच्या नवीन इमारतीतील कलाकृती हजारो वर्षांपासून चालत आलेल्या चिरंतन परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. यासोबतच, वास्तुशास्त्र लक्षात घेऊन आणि इमारतीच्या थीमनुसार त्यांची रचना करण्यात आली आहे.

नवीन संसद भवनाविषयी काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये...- संसदेच्या नवीन इमारतचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे असेल आणि त्याचा अंदाजित एकूण खर्च 971 कोटी रुपये असेल.- संसदेची नवीन इमारत भूकंप रोधक असेल. या इमारतीच्या निर्मितीचे काम प्रत्यक्षात 2000 लोक करतील, तर  9000 लोकं अप्रत्यक्षपणे या कामात भागीदार असतील.- नवीन संसदेच्या इमारतीत एकावेळी 1224 सदस्य बसू शकतील. तर सध्याच्या श्रम शक्ती भवनाच्या (संसद भवन जवळ) ठिकाणी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कार्यालये उभारली जातील.- नवीन संसद भवनात लोकसभा कक्षात 888 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था केली जाईल. तर राज्यसभा कक्षात 384 सदस्य बसू शकतील. भविष्यात संसद सदस्यांची संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन बैठक व्यवस्था जास्तीची बनवली जात आहे.- संसदेची सध्याची इमारत देशाच्या पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केली जाईल आणि ऐतिहासिक वारसा म्हणून त्याचे जतन करण्यात येईल. या नवीन इमारती भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले गेलं आहे.- नवीन संसद भवनाच्या निर्मितीच्या वेळी वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते उपाय केले आहेत.- नवीन संसद भवनात संसदेच्या सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालये असतील. ज्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल सोयी सुविधा असतील. हे एक ती डिजीटल इंडियाच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर येथे एक विशाल संविधान कक्ष असेल. शिवाय संसद सदस्यांसाठी पुस्तकालय, विविध समित्यांचे कक्ष, भोजन कक्ष आणि पार्किंगची सुविधा असणार आहे.- ही नवीन इमारत अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि संरक्षणाच्या दृष्टीनेही परिपूर्ण आहे. ही इमारत त्रिकोणात्मक आकाराची असणार आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदNew Delhiनवी दिल्ली