पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांचे दागिने लांबवले रेल्वे कॉलनीतील घटना : २ भामट्यांनी घातला वृद्ध महिलेला गंडा
By admin | Published: May 11, 2016 10:14 PM
जळगाव : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने २ भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळील रेल्वे कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक करणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने २ भामट्यांनी एका वृद्ध महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळील रेल्वे कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक करणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेल्वे कॉलनीतील प्लॉट क्रमांक २४ मध्ये शोभना श्रीनिवास कुलकर्णी (वय ६९) राहतात. त्यांचे पती श्रीनिवास कुलकर्णी हे रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून नोकरीला होते. त्यांचे ३ वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांच्या पेन्शनमधून कुलकर्णी यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना स्वाती सुरेंद्र मुळे ही मुलगी असून ती नंदुरबारला सासरी राहते. त्या जळगाव येथील घरी एकट्याच राहतात. बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरी असताना २ जण त्यांच्याकडे आले. त्यातील १ जण ४५ ते ५० तर दुसरा २० ते २५ वयोगटातील होता. दोघांनी, आम्ही कंपनीकडून आलो आहोत; घरातील टाइल्स, जुनी भांडी व दागिने आमच्या कंपनीच्या पावडरने स्वच्छ करून देतो. तुमच्याकडे असलेली भांडी दाखवा, आम्ही लगेचच स्वच्छ करून देतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून कुलकर्णी यांनी घरातील पूजेसाठी लागणारा चांदीचा निरंजन व तांब्याचा कळस त्यांच्याकडे दिला. सुरुवातीला दोघांनी ही भांडी साफ करून दाखवली.विश्वास संपादन करून घातला गंडादोन्ही भांडी स्वच्छ झाल्याचे पाहून कुलकर्णी यांनी भामट्यांच्या सांगण्यानुसार, गळ्यातील २० ग्रॅमची सोन्याची चेन व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी स्वच्छ करण्यासाठी त्यांच्याकडे दिली. तेव्हा एकाने त्यांच्याकडील रसायन, सोन्याचे दागिने व हळद कुकरमध्ये टाकून तो कुकर अर्धा तास गॅसवर ठेवण्यास सांगितला. म्हणून कुलकर्णी कुकर गॅसवर ठेवायला घरात गेल्या. दरम्यानच्या काळात दोघांनी हातचलाखीने दागिने लंपास करून तेथून पळ काढला होता. कुकर गॅसवर ठेवल्यानंतर दागिन्यांची चिंता वाटू लागल्याने कुलकर्णी यांनी कुकर उघडून पाहिला असता त्यात दागिने नव्हते. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.फसवणुकीचा गुन्हा दाखलयाप्रकरणी शोभना कुलकर्णी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, दोघा भामट्यांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुलकर्णी यांचे ४० हजारांची २० ग्रॅमची सोन्याची चेन व १० हजार रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी लंपास झाली.