- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना महामारीत सर्वात जास्त फरफट झालेल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहणारे अपुऱ्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. गावात राहणाऱ्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी आरोग्य केंद्रे मोठ्या प्रमाणावर कमी आहेत. गरजेच्या तुलनेत ४८ टक्के सामुदायिक आरोग्य केंद्रे, ७९ टक्के प्राथमिक आणि ७५ टक्के उपकेंद्रेच सुरू आहेत. तेथेही निम्मेच कर्मचारी आहेत.
आरोग्य सेवेवरील सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सरासरी ६,०६३ लोकसंख्येला सगळ्यात खालच्या स्तरावरील आरोग्य सेवा म्हणजे एक उपकेंद्र उपलब्ध आहे. ३५२९५ लोकांच्या आरोग्याची जबाबदारी एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि सरासरी २,३२,२१२ लोक फक्त एका सामुदायिक आरोग्य केंद्रावर आहे.
ग्रामीण आरोग्य आकडेवारीनुसार मार्च २०२० पर्यंत राज्यात ग्रामीण भागात एकूण १४१७० उपकेंद्रे असायला हवीत. पण प्रत्यक्षात १०६४७ सुरू आहेत. २३०९ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना फक्त १८२९ उपलब्ध आहेत. राज्यात सामुदायिक आरोग्य केंद्रांची संख्या २७८ होती. गरज होती ५७७ केंद्रांची. राज्यात गेल्या १५ दिवसात एकूण १९४ उपकेंद्रे आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढवली गेली. पण १०४ सामुदायिक आरोग्य केंद्रे कमी झाली.
अपुरी ग्रामीण आरोग्य व्यवस्थापद कार्यरत कमी स्वीकृत पद एएनएम १२८०४ १९६२ १४७६६डॉक्टर्स २८४८ ७३९ ३५८७विशेषज्ञ चिकित्सक ३९९ ७१३ १११२आयुष चिकित्सक ५९ २१९ २७८रेऑडिलॉजिस्ट १०४ १७४ २७८फार्मासिस्ट १९५८ १४९ २१०७प्रयोगशाळा तंत्रज्ञ १५७४ ५३३ २१०७परिचारिका ३१६५ ६६९ ३८३४आरोग्य सहायक ३००५ ६५३ ३६५८