सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 12:31 PM2018-11-06T12:31:53+5:302018-11-06T12:32:47+5:30

सबरीमाला मंदिर सोमवारी दोन दिवसांसाठी उघडण्यात आले आहे.

52-year-old woman withholds in Sabarimala temple; journalist beaten | सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण

सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण

Next

तिरुवनंतपुरम : मासिक पुजेसाठी आज उघडण्यात आलेल्या सबरीमाला मंदिरामध्ये एका महिलेन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला आतमध्ये जाऊ देण्यात न आल्याने भक्तांनी आंदोलन सुरु केले. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये पत्रकारही जखमी झाला आहे. आपल्या मुलासोबत दर्शनासाठी आलेल्या या महिलेने तिचे वय 2 वर्षे असल्याचे सांगितले आहे. मात्र, हे खरे वय असल्याचे मानायला मंदिर प्रशासनाने नकार दिला आहे. 


सबरीमाला मंदिर सोमवारी दोन दिवसांसाठी उघडण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी 10 ते 50 वर्षे वयातील एकही महिला मंदिराकडे फिरकली नव्हती. मंदिर आज, मंगळवारी अथाझा पुजेनंतर बंद करण्यात येणार आहे. काही हिंदू संघटनांनी महिला पत्रकारांना दूर ठेवण्याचा फतवा गेल्या आठवडयात काढला होता. या पार्श्वभुमीवर मंदिर परिसरात 5 हजार जवान तैनात करण्यात आले होते. 

Web Title: 52-year-old woman withholds in Sabarimala temple; journalist beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.