्न्न्न्न्नराष्ट्रीय लोकअदालतीत ५३ प्रकरणांचा निपटारा
By admin | Published: March 13, 2016 12:05 AM
जळगाव : निरनिराळ्या कारणांनी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणार्या दिवाणी व महसूल प्रकरणांचा त्वरित निपटारा व्हावा, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघातर्फे शनिवारी जिल्हा न्यायालयासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाभरातील ५२ प्रकरणांचा निपटारा होऊन सुमारे ३३ लाख ३५ हजार १८ रुपयांची तडजोड झाली, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणतर्फे देण्यात आली.
जळगाव : निरनिराळ्या कारणांनी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणार्या दिवाणी व महसूल प्रकरणांचा त्वरित निपटारा व्हावा, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघातर्फे शनिवारी जिल्हा न्यायालयासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाभरातील ५२ प्रकरणांचा निपटारा होऊन सुमारे ३३ लाख ३५ हजार १८ रुपयांची तडजोड झाली, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणतर्फे देण्यात आली.जिल्ात एकाच दिवशी ही राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. जळगावात जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर.एम. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत पार पडली. दिवाणी व महसूल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एका पॅनलची स्थापना करण्यात आली होती. या पॅनलवर न्यायाधीश आर.एस. भाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ॲड.स्वाती निकम व ॲड.संख्या साळुंखे यांनी कामकाज सांभाळले. लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.