शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मनी लाँड्रिंगचे ५३ जणांवर खटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:34 AM

५३ जणांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये खटले सुरू करण्यात आले आहेत.

हरीश गुप्ता।नवी दिल्ली : ५३ जणांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये खटले सुरू करण्यात आले आहेत. यातील सारेच आरोपी ब्रिटनला पळून गेले आहेत. तथापि, त्यांच्यापैकी कोणाच्याही प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचालनालय अथवा गृहमंत्रालयाकडून विनंती आपल्याकडे आलेली नाही, अशी धक्कादायक माहिती परराष्टÑ मंत्रालयाने दिली आहे.परराष्टÑ मंत्रालयाने म्हटले की, फक्त सीबीआयकडून विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची विनंती आपल्याला मिळाली. ती ब्रिटनला पाठविण्यात आली आहे. ब्रिटनसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार आहे. त्या करारानुसार, आपण त्यांच्याकडे आरोपींना परत पाठविण्याची मागणी करू शकतो. १९९२ साली करण्यात आलेला हा करार ‘भारत-ब्रिटन परस्पर कायदेशीर साहाय्य करार’ या नावाने ओळखला जातो.मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली किती जणांवर खटले भरण्यात आले आहेत, त्यापैकी किती जण फरार आहेत, तसेच विदेशात पळालेल्यांपैकी किती जणांना परत आणण्यासाठी गृहमंत्रालयाकडून विनंत्या आल्या आहेत, यासंबंधीचा तपशील परराष्टÑ मंत्रालयाकडे मागण्यात आल्या होत्या. त्याच्या उत्तरात ही माहिती मंत्रालयाने दिली आहे.परराष्टÑ मंत्रालयाने म्हटले की, अंमलबजावणी संचालनालयाकडून ५३ जणांविरुद्ध खटल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, त्यापैकी कोणत्याही आरोपीच्या प्रत्यार्पणाची विनंती आपल्याला अंमलबजावणी संचालनालय अथवा गृहमंत्रालयाकडून मिळालेली नाही.>मनी लाँड्रिंगचा खटला सुरू असलेले व्यक्तीअनिल जैन, यश दिलीप जैन, पुखराज आनंदमल मुथा, मुन्नीचंद एस. भंडारी, सुरेंद्रकुमार डुंगरवाल, अजित अन्नू कामथ, अमित खिचा, बिलाल हारुण गलानी, मदनलाल जैन, मीना मदनलाल जैन, परमेश्वर अर्जुन पारीख, जावेरी जैन, जयेश जैन, कावित केडिया, मुकेश जैन, इर्फान फर्निचरवाला, सुनील कोठारी, हर्षद मगनलाल मोदी, दीपक शेनॉय, संतोष नाईक, सर्फराज गोदिल, मुकुंदभाई, आश्विनभाई, पी. उमेशचंद्र, दीपककुमार विठ्ठल दास, पटेल आश्विन हरिभाई, अब्दुल करीम जाका, सत्यनारायण ताराचंद जाजू, विक्रम जयंतीलाल चोक्सी, राकेश श्यामलाल जरीवाला, सुरेंद्र सिंग सिद्धू, विनोद गंगाराम दत्त, उरितखिनबाम बुधीचंद्रा सिंग, कांगुजाम प्रेमजित सिंग, श्रीमती लोंगजाम निनगोल कांगुजाम ओंगबी एलिजाबेथ देवी, श्रीमती कांगुजाम सनाजाओबी देवी, मोहम्मद कोमिरुद्दीन, परमजित सिंग संधू, गुलशन माशील, विजय मल्ल्या, नितीश ठाकूर, पाशा सत्यनारायण, जगदीश अलगा राजा, अंजना चोक्सी, कौस्तुभ चोक्सी, रवींद्र देशमुख, अजित साटम, गंगाधरम जी. येळीगट्टी, विजय कोठारी, श्रीधर धनपाल, हरप्रीत सिंग, अमितकुमार.