५३ लाखाची पंजाबची दारु पकडली राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : एरंडोलजवळ मुंबई व जळगावच्या पथकाने टाकला छापा
By admin | Published: March 21, 2016 12:21 AM
जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व जळगावच्या भरारी पथकाने रविवारी पहाटे साडे चार वाजता एरंडोलजवळ हॉटेल फांऊटनसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर छापा टाकून ५३ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीची पंजाब स्पेशल व्हीस्की नावाची इंग्रजी दारु पकडली. या ट्रकमध्ये एकुण एक हजार चारशे खोके होते, त्यात ७५० मि.ली.च्या १६ हजार ८०० बाटल्या होत्या. पंजाब राज्यातून धुळ्याकडे ही दारु जात होती.
जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व जळगावच्या भरारी पथकाने रविवारी पहाटे साडे चार वाजता एरंडोलजवळ हॉटेल फांऊटनसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर छापा टाकून ५३ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीची पंजाब स्पेशल व्हीस्की नावाची इंग्रजी दारु पकडली. या ट्रकमध्ये एकुण एक हजार चारशे खोके होते, त्यात ७५० मि.ली.च्या १६ हजार ८०० बाटल्या होत्या. पंजाब राज्यातून धुळ्याकडे ही दारु जात होती.पंजाबमधून अवैधरित्या दारु महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आयुक्त विजय सिंघल व संचालक बी.जी.शेखर यांनी मुंबईचे पथक जिल्ात पाठविले होते. त्यासाठी जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव यांना त्यांच्या भरारी पथकालाही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.पंजाबमधून एक बारा चाकांचा ट्रक (पी.बी.११ बी.आर.४५५३) ५३ लाखाची दारु घेवून निघाल्याची माहिती मिळाल्यावरुन मुंबई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक ए.पी.तारु, पी.जी.अवचर व संजय केंद्रे यांचे पथक जिल्ाच्या हद्दीत पोहचले असता ट्रक एरंडोलजवळ महामार्गावर एका ढाब्यावर थांबल्याची माहिती त्यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी जिल्ाच्या पथकाला कळविले. भरारी पथकाचे एल.एच.पाटील, एल.व्ही.पाटील, आर.के.लब्दे, सहायक निरीक्षक आय.बी.बाविस्कर, नितीन पाटील, आर.डी.राठोड व गोकुळ अहिरे यांचे पथकही व मुंबईचे पथक एकत्र आल्यानंतर ट्रकवर संयुक्तरित्या छापा टाकला असता त्यात पंजाबची दारु असल्याचे निष्पन्न झाले.ट्रक व आरोपी आणले जळगावातयावेळी पथकाने जसपाल दासमल छेंजोत्रा (वय ४७ रा. कठाणा, ता.जि.पठाणकोट, पंजाब) व बलबीरसिंग संतासिंग (वय ४० रा.अलेना ता.झिरा जि.फिरोजपूर, पंजाब) या दोघांसह ट्रक ताब्यात घेवून जळगावात आणले. पंचनामा केल्यानंतर आरोपींना एरंडोल येथे नेण्यात आले.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इन्फो..ट्रकमध्ये टाकली कोलगेट पावडरलांबच्या प्रवासात दारुच्या बाटल्या फुटून त्याचा वास येवू नये यासाठी ट्रकमध्ये कोलगेट पावडर टाकण्यात आली होती. रस्त्यात ट्रक अडविला तरी त्यात कोलगेट आहे, असे सांगून ट्रक पुढे नेला जात होता. बींग फुटू नये म्हणून ही शक्कल लढविण्यात आली होती,असे आरोपींनीच अधिकार्यांना सांगितले. हा ट्रक गुजरातमध्ये जात असल्याची माहिती मिळाली.