ऐझॉल : सोमवारी पहाटे भूकंपाने मिझोराम हादरले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.३ एवढी होती. भूकंपाच्या हादऱ्याने अनेक घरांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांना तडे गेले आहेत. सुदैवाने, जीवितहानीचे वृत्त नाही. राज्याच्या भूगर्भशास्त्र आणि खनिज संसाधन विभागाच्या अधिकाºयाने राष्टÑीय भूगर्भशास्त्र विभागाच्या हवाल्याने सांगितले की, सोमवारी पहाटे ४.१० वाजता झालेल्या भूकं पाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमेवरील चम्प्फाई जिल्ह्यातील झोख्वाथर येथे होता. ऐझॉलसह राज्याच्या अनेक भागांत भूकंपाचे हादरे बसले. चम्प्फाई जिल्ह्यातील अनेक घरे आणि इमारती, तसेच झोख्वाथरमधील एका चर्चचे भूकंपाच्या हादºयाने नुकसान झाले. अनेक ठिकाणी महामार्ग आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. नुकसानीचा अंदाज लावला जात आहे, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री झोरोमथंगा यांच्याशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला, तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.शनिवारी सायंकाळी ४.१० वाजताही मिझोराम ५.१ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले होते. या भूकंपाचे धक्के मेघालय आणि मणिपूरलाही बसले होते. १८ जून रोजी हा भूंकप झाला होता. स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासन नुकसानीचे आकलन करीत आहेत, असे मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी सांगितले.
५.३ तीव्रतेच्या भूकंपाने मिझोराम हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 3:35 AM