दरभंगा : येथील सरकारी दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शिकणा-या तब्बल ५४ विद्यार्थिनींना रॅगिंगप्रकरणी प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत दंड न भरल्यास अधिक कडक कारवाई करण्याचा इशाराही कॉलेजच्या प्रशासनाने दिला आहे.दंड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये पहिल्या आणि दुसºया वर्षाच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे. वरच्या वर्गातील विद्यार्थिनींना कथित रॅगिंगबद्दल व कनिष्ठ वर्गातील विद्यार्थिनींना त्यांचे रॅगिंग करणाºयांची नावे न सांगण्याबद्दल दंड करण्यात आला. गेल्या १५ दिवसांतील बिहारमधील असा दंड होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी भागलपूर येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या दुसºया वर्षाच्या ३३ विद्यार्थिनींना रॅगिंगबद्दल प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला गेला होता. (वृत्तसंस्था)>मेडिकल कौन्सिलकडे केली होती तक्रारकॉलेजच्या प्राचार्या डॉ. आर. के. सिन्हा यांनी सांगितले की, पहिल्या वर्षात शिकणाºया एका विद्यार्थिनीने मेडिकल कौन्सिलकडे रॅगिंगची तक्रार नोंदविली होती. कौन्सिलने ती तक्रार आमच्याकडे पाठवून कारवाई करण्यास सांगितल्यावर लगेच रॅगिंगविरोधी समितीची बैठक घेण्यात आली. समिती चौकशीसाठी विद्यार्थिनींच्या हॉस्टेलवर गेली असता रॅगिंगबद्दल कोणीच माहिती दिली नाही. त्यामुळे कौन्सिलच्या नियमानुसार हॉस्टेलवर राहणाºया सर्व विद्यार्थिनींना दंड ठोठावण्यात आला.
रॅगिंगप्रकरणी ५४ विद्यार्थिनींना दंड, प्रत्येकी २५ हजार भरण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 4:21 AM