आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक पार पडली आहे. काही घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले आहे. २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पड़ले आहे. यापैकी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान नोंदविले गेले आहे. या मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचे मतदान टक्केवारी आली आहे. देशात 59.71 टक्के मतदान झाले आहे.
आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्किमच्या 92 विधानसभा मतदारसंघातही मतदान पार पडले आहे.
सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून 77.57% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून 76.10% मतदान झाले आहे. मेघालय 69.91%, मध्य प्रदेश 63.25%, तामिळनाडु 62.08%, यूपी 57.54%, बिहार 46.32%, उत्तराखंड 53.56%, जम्मू-कश्मीर 65.08%, राजस्थान 50.27%, छत्तीसगढ़ 63.41%, असम 70.77%, पाँडिचेरी 72.84%, अरुणाचल 64.07%, नागालैंड 56.18%, मिजोरम 53.96%, सिक्किम 68.06%, मणिपुर 68.62%, अंडमान निकोबार 56.87%, लक्षद्वीप 59.02%, महाराष्ट्र 54.85% एवढे मतदान झाले आहे.
सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचे जाणकार सांगतात. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झाले होते. परंतु भाजपाचे सरकार पुन्हा आले होते. तर २००९ पेक्षा २०१४ मध्ये जास्त मतदान झाले होते. तेव्हा सत्तांतर झाले होते. यामुळे हे कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे हे ४ जूनलाच समजणार आहे.