५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी केली निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग :जिल्ात नाही ब्रिटीशकालीन पूल
By admin | Published: August 04, 2016 11:34 PM
जळगाव : रायगड जिल्ातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर राज्य शासनाने माहिती मागविली आहे. जिल्ात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी ५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी शासनाकडे पाठविला आहे.
जळगाव : रायगड जिल्ातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर राज्य शासनाने माहिती मागविली आहे. जिल्ात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी ५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी शासनाकडे पाठविला आहे.महाड येथील दुर्घटनेनंतर राज्य शासनाने ब्रिटीशकालीन पुलांची माहिती मागविली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा एकही ब्रिटीशकालीन पूल नसल्याचे या विभागाने शासनाला कळविले आहे. मात्र जिल्हाभरातील ५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी गरज असल्याचे कळविले आहे. तात्पुरती दुरुस्ती व कायमस्वरूपी दुरुस्ती असे दोन प्रस्ताव या कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविले आहे. या ५५ पुलांची कायमस्वरुपी दुरुस्ती करायची असल्यास ७५ कोटींच्या निधीची तसेच तात्पुरती दुरुस्ती करायची असल्यास १० कोटींच्या निधीची गरज असल्याचे या विभागाने कळविले आहे.