नवी दिल्ली : सुमारे १२ वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये मिग विमान क ोसळून क ायमचे अपंगत्व आलेले त्या विमानाचे वैमानिक विंग क मांडर संजित सिंग कैला यांना ५५ लाख रु पये भरपाई देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. यापैक ी पाच लाख रु पये भारतीय हवाईदलाने, तर ५० लाख रु पये मिग विमानांचे उत्पादन क रणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.ह्ण (एचएएल) या भारत सरक ारच्या कंपनीनेद्यायचेआहेत. ज्यामुळेविंग क मांडर संजित सिंग यांना अपंगत्व आलेव परिणामी त्यांनासैन्यदलातील भावी सेवेसाठी अपात्र व्हावे लागले. तो अपघात त्यांच्या चुक ीमुळे नव्हे, तर मिग विमानाच्या सदोष उत्पादनामुळे झाला होता, हे मान्य क रू न न्या. एस. रवींद्रभट आणि न्या. दीपा शर्मायांच्या खंडपीठानेहा भरपाईचा आदेश दिला.या अपघाताची हवाईदलाने क ोर्टआॅफ एन्क्वायरी नेमून चौक शी केली होती व त्यात विमानाचेउत्पादनसदोष होतेव त्यामुळेअपघात झाला, असा निष्क र्षक ाढण्यात आला होता. विंग क मांडर कै ला यांनी हा चौक शीअहवाल आरटीआय खाली मिळविला व त्याआधारे भरपाईसाठी याचिक ा के ली. ती मंजूर क रू नन्यायालयानेवरीलप्रमाणेभरपाईमंजूर केली. हवाईदलाची अनेक मिग विमाने क ोसळून त्यात वैमानिक मृतकिंवा जखमी झालेले आहेत; परंतु मुळात विमानच सदोष होतेया मुद्यावर जखमी झालेल्या वैमानिक ास भरपाईदिली जाण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. हवाईदलाने केलेला बचाव अमान्य क रताना न्यायालयाने म्हटले क ी, सैन्यदलांमधील नोक री जीवावर बेतणारी असतेव ती बजावत असताना जीवावर उदार होणे अपेक्षितच असते, हे मान्य केले तरीमुळात सदोष उत्पादन झालेलेविमान उड्डाणासाठी वैमानिक ास देणेहेत्याचा जीव अपेक्षेपेक्षा जास्त धोक्यातघालणारेआहे. यामुळेयाचिक ाक र्त्या वैमानिक ाच्या जगण्याच्या मूलभूत हक्क ाची पायमल्ली झाली. याचीजबाबदारी हवाईदल आणि विमानाचे उत्पादन क रणारी कंपनी टाळू शक त नाही. (वृत्तसंस्था)
‘मिग’ कोसळून अपंग झालेल्या वैमानिकास ५५ लाख भरपाई
By admin | Published: May 03, 2017 6:56 AM