नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या ५६ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचार्यांनी लगेचच फिल्डिंगही लावण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत शहरातील सहाही विभागीय कार्यालयांत तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ५६ कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश उपआयुक्तांनी काढले आहेत. अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने संबंधित कर्मचार्यांकडून हितसंबंध जोपासले जात असल्याच्या तक्रारी अनेकदा महासभेत सदस्यांनी केल्या आहेत. याशिवाय महापालिकेकडून होणार्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेची खबरही काही कर्मचार्यांमार्फत संबंधित अतिक्रमणधारकांपर्यंत पोहोचविली जात असल्याचे आरोप केले जातात. त्या पार्श्वभूमीवर उपआयुक्तांनी सहाही विभागातील एकूण ५६ कर्मचार्यांच्या विभागातच बदल्या केल्या आहेत. दरम्यान, बदल्या रद्द व्हाव्यात यासाठी काही कर्मचार्यांनी फिल्िंडग लावली आहे, तर विभागीय अधिकार्यांमार्फतही कर्मचारी कार्यमुक्त करण्यास नकार दिला जात आहे.
अतिक्रमण विभागातील ५६ कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Published: July 09, 2015 9:53 PM