कराची/पेशावर : पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीजवळ शुक्रवारी दोन आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आले. या हल्ल्यांत ५६जण ठार झाले असून, ५०जण जखमी झाले आहेत. ईद-ए-मिलाद साजरी करण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने जमले असताना हा हल्ला करण्यात आला.
ईद मिरवणूक काढण्याची तयारी सुरू असताना आत्मघाती हल्लेखोराने पोलिस उपअधीक्षकाच्या कारजवळ स्वत:ला उडवून दिले. २० गंभीर जखमींना क्वेटा येथे हलवण्यात आले.
नमाजच्या वेळी आणखी एक हल्ला, चार ठारnखैबर पख्तुनख्वा प्रांताच्या हंगू शहरातील मशिदीजवळ शुक्रवारच्या नमाजच्या वेळी करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात चार लोक ठार, तर १२जण जखमी झाले. ही मशीद दाओबा पोलिस ठाण्याजवळ आहे.nपाच दहशतवादी पोलिस ठाण्यात घुसले होते, परंतु पोलिसांनी लगेच गोळीबार केला. यात एक दहशतवादी ठार झाला, तर दुसऱ्याने मशिदीजवळ स्वत:ला उडवले. त्यामुळे मशिदीचे छत कोसळले.