ऑनलाइन लोकमत
मलकानगिरी, दि.१३ - ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात रविवारी ५७ माओवाद्यांनी पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केल्याने राज्यातील नक्षलवाद्यांना जबरदस्त हादरा बसला आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भाकपा (माओवादी) च्या आंध्र-ओडिशा क्षेत्रीय कमिटी डिव्हीजनच्या सदस्यांचा समावेश आहे. हे सर्व जण तानगुडाचे राहणारे आहेत. या सर्व माओवाद्यांचे सरकारी धोरणानुसार पुनर्वसन करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले