शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धक्कादायक! देहरादूनमध्ये 57 ट्रेनी IAS अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 10:09 PM

अकादमीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी 'भाषा'ला दिलेल्या माहितीनुसार, 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याने संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद राहील.

देहरादून - संपूर्ण देशात कोरोना महामारीचा हाहाकार सुरू आहे. आता ही आग देहरादून येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासनिक अकादमीपर्यंत (Lal Bahadur Shastri National Academy of Administration) पोहोचली आहे. येथील 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोठ्या संख्येने संक्रमण पसरल्याने  तीन डिसेंबरपर्यंत संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकादमीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी 'भाषा'ला दिलेल्या माहितीनुसार, 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याने संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद राहील. तसेच यादरम्यान प्रशिक्षणासह सर्व प्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनेच केले जातील. त्यांनी सांगितले, की शुक्रवारपासून आतापर्यंत 57 ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्या सर्वांना विशेष पद्धतीने तयार केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये वेगळे ठेवण्यात आले आहे. शुक्रवारपासून आजपर्यंत अकादमीत 162 आरटी पीसीआर टेस्ट (RT PCR Test) करण्यात आल्या. ट्रेनी अधिकारी आणि स्टाफ सदस्यांकडून सोशल डिस्टंसिंग ठेवणे, सातत्याने हात धुणे आणि मास्क लावण्यासंदर्भातील प्रोटोकॉलचे सातत्याने पालन केले जात आहे. 

देहरादूनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारच्या जवळ पोहोचली - कोविड 19 इंडियानुसार, उत्तराखंडमध्ये कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 70,790 वर पोहोचली आहे. यांपैकी 1146 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देहरादूनमध्ये आतापर्यंत 1.9 लाख टेस्ट झाल्या असून संक्रमितांचा आकडा 19920 वर पोहोचला आहे. तर येथे देहरादून जिल्ह्यात आतापर्यंत 635 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

भारतात कोरोना रुग्णांची संख्या 91 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1 लाख 33 हजार 282 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 4 लाख 40 हजार 708 एवढी आहे. तर 85 लाख 21 हजार 465 जण बरेही झाले आहेत.

गेल्या 6 दिवसांतील दिल्लीतील मृतांचा आकडा  -21 नोव्हेंबर - 111 20 नोव्हेंबर - 11819 नोव्हेंबर - 9818 नोव्हेंबर - 131 17 नोव्हेंबर  - 9916 नोव्हेंबर - 99

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर राजेश पारिख म्हणाले, ही तिसरी लाट आहे, असे मला वाटत नाही. सध्या ही पहिलीच लाट आहे. जेव्हा पहिल्या लाटेत कोरोना रुग्ण आढळणे पूर्णपणे बंद होईल, तेव्हाच दुसरी लाट अथवा तिसरी लाट म्हणता येईल. राहिला प्रश्न कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा, तर फेस्टिव्ह सीझनमध्ये आपण सावधगिरी बाळगायला हवी होती. मात्र, येथेच चूक झाली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल