नवी दिल्ली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-१७) रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जाणाऱ्या भागाच्या रुंदीकरणामुळे तेथील वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर होणारा दुष्प्रभाव कमी करण्याचे विविध उपाय योजण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ५८ कोटी १६ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये हा माहिती दिली. यात वन्यजीवांना रस्ता न ओलांडता पलीकडे जाता यावे यासाठी प्रत्येकी तीन मीटर रुंद व ३.५ मीटर उंचीचे चार ‘पॅसेजेस’ व तीन मीटर रुंद व तीन मीटर उंचीचे सात ‘बॉक्स कल्व्हर्ट) बांधल्या जातील. अशा सोयींसाठी एकूण २७ बांधकामे केली जातील. (विशेष प्रतिनिधी)
कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांसाठी ५८ कोटी
By admin | Published: June 22, 2016 4:30 AM