5G Service Launch: भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. जिओ आणि एअरटेलने येत्या दिवाळीपर्यंत देशातील काही शहरांमध्ये 5G सुरू करण्यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, 'येत्या दोन वर्षात देशभरात 5G सेवा सुरू होईल', अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
सरकारने ऑगस्टमध्ये दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप पत्र जारी केले होते. यानंतर सरकारने त्यांना 5G सेवांच्या रोलआउटची तयारी करण्यास सांगितले. या स्पेक्ट्रम वाटपासह, भारत हाय-स्पीड 5G दूरसंचार सेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रिलायन्स जिओने या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यासारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हाय-स्पीड 5G टेलिकॉम सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर, डिसेंबर 2023 पर्यंत त्यांचे 5G नेटवर्क देशभरातील प्रत्येक शहरात विस्तारले जाईल.
कशी असेल 5Gची स्पीड5G हे पाचव्या पिढीचे(5th Geeration) मोबाइल नेटवर्क आहे. मोठ्या प्रमाणात डेटाचे आदान-प्रदान करण्यासाठी 5Gचा उपयोग होईल. 3G आणि 4G च्या तुलनेत, 5G 10 पट वेगवान असण्याची अपेक्षा आहे. 5G रोलआउटमुळे खाणकाम, वेअरहाउसिंग, टेलिमेडिसिन आणि उत्पादन यासारखी क्षेत्रे रिमोट डेटा मॉनिटरिंगमध्ये आणखी प्रगती होण्याची अपेक्षा आहे.
सरकारला किती महसूल मिळालास्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ, अदानी ग्रुप, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया हे चार प्रमुख सहभागी होते. लिलावातून दूरसंचार विभागाला एकूण 1.50 लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. लिलावातून मिळणारा महसूल सुरुवातीला 80,000-90,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज होता.