टुुमकुरू (कर्नाटक) : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत एकाच वेळी देशातील सहा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १२ हजार कोटी रुपये जमा केले.येथे एका कार्यक्रमात त्यांनी निवडक शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्कारही प्रदान केले. मोदी म्हणाले की, काही राज्यांनी अद्याप ही योजना लागू केलेली नाही. क्षुद्र वृत्तीच्या राजकारणामुळे गरीब शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्या वर्षात ही राज्ये या योजनेत सहभागी होतील, असा मला विश्वास वाटतो. शेतकऱ्यांच्या आशाआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकºयांना दिलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेतली आहे.मोदी म्हणाले, आमच्या राजवटीत मदतीची सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. अनेक वर्षे रखडलेल्या जलसिंचन योजना सरकारने मार्गी लावल्या आहेत. मच्छीमारांना बोटी विकत घेण्यासाठी, बोटींचे आधुनिकीकरण, मासेमारीशी संबंधित सुविधा उभारणीसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाते, असेही ते म्हणाले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्यांनी अल्पसंख्याकांवर धार्मिक अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करावीत, असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला. ते म्हणाले, धर्माच्या आधारावर निर्मिती झालेल्या पाकमध्ये हिंदू, शीख, जैैन, ख्रिश्चनांवर अत्याचार केले जातात. त्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. पण त्याबद्दल काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष चकार शब्द काढत नाहीत.काय आहे योजना?गेल्या वर्षी ही योजना जाहीर करण्यात आली, तेव्हा अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी चार टप्प्यांत ८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. नंतर सर्वच शेतकºयांना दर तीन महिन्यांना २ हजार याप्रमाणे एकूण ८ हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी दोन हप्त्यांची रक्कम शेतकºयांच्या खात्यांत आधीच जमा करण्यात आली आहे. हा तिसरा हप्ता आहे.माहितीसाठी टोल फ्री नबंरया योजनेनुसार शेतकºयांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला की नाही, याची माहिती आता टोल फ्री नंबरच्या माध्यमातून घेता येईल. केंद्राने लाभार्थी शेतकºयांसाठी १५५२६१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे.
सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत १२ हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 5:09 AM