अहमदाबाद - गुजरातमध्येमकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. पतंगबाजी करताना मांज्यामुळे गळा कापला जाऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 500 हून अधिक जण जखमी झाले असून 100 हून अधिक जण छतावर खाली पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी आपत्कालीन सेवा क्रमांक 108वर भरपूर कॉल्स आले. यामध्ये पतंगबाजी करताना छतावरुन खाली कोसळल्याच्या घटनांचा अधिक समावेश होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहसाणा जिल्ह्यात पतंगीच्या धारदार मांज्यामुळे गळा कापला गेल्यानं आठ वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. बदलापूरमध्येही एका युवकाच्या गळ्याला मांज्यामुळे फास बसला. यातून त्याची तातडीनं सुटका करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
700 हून अधिक पक्षी जखमी पतंगबाजीमुळे केवळ माणसांप्रमाणेच पक्षी-प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मांज्यामुळे घायाळ झालेल्या पक्ष्यांनाही उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (14 जानेवारी) 472 पक्षी तर मंगळवारी (15 जानेवारी) 230 पक्षी माज्यांमुळे जखमी झाले आहे.