नेल्लोर : वीज वितरण कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागल्यानंतर लाइन इन्स्पेक्टर बनलेल्या एका कर्मचाऱ्याकडे ६ अलिशान बंगले, अनेक एकर जमीन आणि कोट्यवधींची माया असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या महिन्यात दहा कोटींची माया असलेल्या सर्वांत श्रीमंत प्यूनला अटक केल्यानंतर आंध्र प्रदेशातील हे नवे प्रकरण समोर आले आहे.ट्रान्समिशन कॉर्पोरेशन आॅफ आंध्र प्रदेश (एपी ट्रान्स्को)च्या नेल्लोर जिल्ह्यातील सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात एस. लक्ष्मी रेड्डी (५६ वर्षे) हा लाइन इन्स्पेक्टर म्हणून काम करतो. त्याच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे कळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने छडा लावण्यासाठी नेल्लोर व प्रकाशम जिल्ह्यातील पाच ठिकाणी धाडी टाकल्या. यासंदर्भात तपास अधिकाºयांनी सांगितले की, या दोन जिल्ह्यांमध्ये रेड्डीच्या मालकीची काही एकर जमीन व ६ आलिशान घरे आहेत. या सर्व मालमत्तेची किंंमत सुमारे १०० कोटी रुपये इतकी होईल, असे प्राथमिक तपासावरून वाटते. या लाचखोर लाइन इन्स्पेक्टरला गुरुवारी अटक केली.सदर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी आॅफ आंध्र प्रदेश लिमिटेड (एसपीडीसीएल) या सरकारी कंपनीत तो १९९३ साली हेल्पर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याला सहाय्यक लाइनमन म्हणून १९९६ साली बढती देण्यात आली. २०१४ पासून मुंगमूरु गावात तो लाइन इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. (वृत्तसंस्था)>सर्व संपत्ती पत्नीच्या नावेकावली या शहरातील रेड्डी व त्याच्या वडिलांचे निवासस्थान तसेच त्याचे मित्र, नातेवाईक यांच्या घरांवरही धाडी घालण्यात आल्या. ५७.५० एकर शेतजमीन, सहा आलिशान घरे, दोन भूखंड त्याने विकत घेतले असून बँक खात्यामध्ये ९ लाख ९५ हजार इतकी शिल्लक आढळून आली. तसेच त्याने काही वाहनेही खरेदी केली आहेत. लाचखोरीबरोबरच एपी ट्रान्स्कोच्या गोदामातील तांब्याच्या तारा व अन्य वस्तंूची चोरी करुन व त्या विकून त्याने खूप पैैसे मिळवले असण्याची शक्यता आहे. रेड्डीने बहुतांश मालमत्ता पत्नी एस. सुहासिनी हिच्या नावे केली आहे.
हेल्परपासून लाइन इन्स्पेक्टर बनलेल्या आंध्रातील वीज कर्मचाऱ्याकडे ६ आलिशान बंगले, १०० कोटींची माया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 4:18 AM