हिमस्खलन दुर्घटनेनंतर ६ हेलिकॉप्टर, १ एअर अॅम्ब्युलन्स अन् २०० जवान रेस्क्यू अभियानात सक्रीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 09:50 IST2025-03-02T09:50:02+5:302025-03-02T09:50:57+5:30
माणा येथील बेस कॅम्पमध्ये लष्कराने हेलिपॅड तयार केले आहे. बद्रीनाथ इथल्या लष्कराच्या हेलिपॅडवर ६-७ फूट बर्फ होता, तो हटवण्यात आला आहे.

हिमस्खलन दुर्घटनेनंतर ६ हेलिकॉप्टर, १ एअर अॅम्ब्युलन्स अन् २०० जवान रेस्क्यू अभियानात सक्रीय
डेहाराडून - माणा परिसरात झालेल्या हिमस्खलनामुळे अनेक कामगार अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सरकारनं युद्ध स्तरावर रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. त्यात लष्कराचे एमआय १७ हेलिकॉप्टर, ३ चिता हेलिकॉप्टर, उत्तराखंड सरकारचे २ हेलिकॉप्टर, एम्स ऋषिकेशहून एक एअर अॅम्ब्युलन्स मदत आणि बचाव कार्यात सक्रीय करण्यात आले आहेत. गरज भासल्यास आणखी हेलिकॉप्टर मागवण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मीणा येथून रेस्क्यू केलेल्या लोकांपैकी २९ जणांना हेलिकॉप्टरने जोशीमठ येथे आणण्यात आले. ज्यांच्यावर लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी बद्रीनाथ येथे जवळपास २०० जण मदत आणि बचाव कार्यात सहभागी झालेत. त्यात आपत्कालीन व्यवस्थापनाचे कर्मचारी, आयटीबीपी, बीआरओ, एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, खाद्य विभाग यांचा समावेश आहे.
प्रदेश सरकार आपदा प्रभावितों के साथ पूरी तरह खड़ी है और किसी भी आपात स्थिति से निपटने के लिए सभी जरूरी कदम उठाए जा रहे हैं। pic.twitter.com/0nTFu37wcl
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) February 28, 2025
माणा येथील बेस कॅम्पमध्ये लष्कराने हेलिपॅड तयार केले आहे. बद्रीनाथ इथल्या लष्कराच्या हेलिपॅडवर ६-७ फूट बर्फ होता, तो हटवण्यात आला आहे. ब्रदीनाथ येथील बर्फवृष्टीमुळे या परिसरातील ५-६ किमी रस्ते बंद आहेत. जे पुन्हा कार्यरत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सर्वांशी समन्वय साधत आहेत. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जात असून सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत.
दरम्यान, लामबगड येथून पुढे जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने रेस्क्यू टीमला घटनास्थळी पोहचायला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे, कुशल मार्गदर्शनात सर्व विभागातील कर्मचारी बचाव कार्यात जीवापाड मेहनत घेत आहेत. मदत आणि बचाव पथके न थांबता जोमाने या कार्यात उतरली आहेत.
रस्ते बांधकाम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित स्थळी पाठवा - मुख्यमंत्री
शनिवारी सकाळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बद्रीनाथ परिसराचं हवाई सर्वेक्षण केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बद्रीनाथ भागात अधिक प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. ६ ते ७ फूट बर्फाचा थर साचला आहे. येणाऱ्या काळात हिमस्खलनाचा धोका पाहता त्याठिकाणी रस्ते बांधकाम करणाऱ्या सुरक्षित स्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत आपत्कालीन विभागाचे सचिव यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचनाही केली आहे.