शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

भगवंत मान यांच्यासह ६ जणांचा बुधवारी शपथविधी; शहीद भगतसिंग यांच्या गावात जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:02 AM

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात.

- तक्षकचंडीगढ : पंजाबमध्ये शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कला येथे १६ मार्च रोजी होणार असलेल्या शपथविधी समारंभात आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची व ६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांत अमन अरोडा, हरपाल सिंग चीमा, कुलतार सिंग संधवा, हरजोत बैंस, बलजिंद्र कौर आणि कुंवर विजय प्रताप सिंग यांचा समावेश आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित ही शपथ देतील.

पंजाब मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, तेव्हा आणखी ११ आमदारांना मंत्रीपद दिले जाईल. आपने पंजाबमध्ये ११७ सदस्यांच्या विधानसभेत ९२ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आपने २० जागा जिंकल्या होत्या. परंतु, ५ वर्षे पूर्ण होता होता ५ आमदारांनी पक्ष सोडला.  मुख्यमंत्री आणि १७ मंत्र्यांनी एकाच वेळी शपथ घ्यावी, असे पक्षश्रेष्ठींचे मत नाही. यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची संधी मिळते. याबाबत बलवंत मान आधीच म्हणाले आहेत की, फक्त १७ आमदार मंत्री बनू शकतात. त्यामुळे मंत्री न बनणाऱ्या आमदारांनी नाराज होऊ नये.

हिमाचल प्रदेशात सर्व जागा लढविणार-

पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने आता शेजारच्या हिमाचल प्रदेशातही पाय पसरण्याची तयारी शुरू केली असून, विधानसभेच्या सर्व ६८ जागांवर निवडणूक लढविणार आहे. हिमाचल प्रदेशात याचवर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआप