६ अधिकार्यांचे पगार रोखले मनपा आयुक्तांचा दणका : गोलाणी लेखापरीक्षणावर अनुपालन अहवालावर टाळाटाळ
By admin | Published: September 18, 2016 10:35 PM
जळगाव : गोलाणी मार्केटच्या लेखापरीक्षण अहवालावर मनपातील सहा अधिकार्यांनी त्याच्या विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल वारंवार सूचना देऊनही सादर न केल्याने या विभाग प्रमुखांचे वेतन आयुक्तांनी रोखले आहे. आता लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पायल प्रविण मनोत ही काष्टी येथील महाविद्यालयीन तरुणी़ गृहसजावट हा तिचा लहानपणापासूनचा छंद़ मेहंदी, रांगोळी काढण्याची इतर मुलींसारखी तिलाही आवड़ या आवडीतूनच पायलने संक्रांतीसाठी करंडे, दिवाळीसाठी आकर्षक पणत्या, आकाश कंदील, वेगवेगळ्या प्रकारचे हार, मोबाईल पाऊच, भेट कार्ड, डोहाळे कार्यक्रमासाठी श्रृंगार व इतर कलात्मक वस्तू तयार केल्या़ एव्हढ्या सार्या छान छान वस्तू तयार केल्यानंतर त्यांचे करायचे काय, असा प्रश्न कोणासमोरही उपस्थित होणारच़ तसा तिच्यासमोरही होता़ या वस्तू लोकांना विकण्याचा तिने निर्णय घेतला़ तिच्या वस्तू हातोहात विकल्या जाऊ लागल्या़ त्यातून चांगले अर्थाजन होऊ लागले़ एकीकडे तिचे ज्ञानार्जन सुरु होते, तर दुसरीकडे अर्थाजनही सुरु झाले़ तिची आवड तिच्या उत्पन्नाचे साधन झाली होती़ आवडीतून हातात आलेल्या कलेने पायलला बर्यापैकी पैसे मिळू लागले़ या पैशातून काहीतरी विधायक काम करायचा निर्णय तिने घेतला़ गरिब मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा वापरायचा तिने निश्चय केला़ सुरुवातीला दोन मुली तिने शिक्षणासाठी दत्तक घेतल्या़ त्यामुळे गरिब घरातील दोन मुलींच्या आयुष्यात नवा आशेचा किरण आला़ त्यानंतर पायलने ३० मुलींना गणवेशाची स्नेहभेट दिली़ काष्टीतील डोंबारी वस्तीतील बालसदनासाठी एक कपाट, टेबल भेट दिला़ काष्टी येथील कन्या जनता विद्यालयातील मुलींना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी एक बोअर घेतला़ पाण्याची टाकी व पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविली़ त्यामुळे जनता विद्यालयातील मुलींच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटला आहे़ वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या पायलने आपल्या आवडीलाच करिअरचे स्वरुप दिले आहे़ मात्र, हे करिअर निव्वळ पैसे मिळविण्यासाठी नाही तर स्वकमाईतील ५० टक्के रक्कम गरिब मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा ध्यास तीने घेतला आहे़ ़़़़़़़़़़़़़़़ज्येष्ठ समजसेवक अण्णा हजारे यांचा प्रभाव पडला आणि समाजसेवेची आवड निर्माण झाली़ गावाकडे दुष्काळ पडला होता़ आईचा फोन आला त्यावेळी मी मैत्रीणींसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पित होते़ आई म्हणाली, तुम्ही मुली तिकडे कॅन्टीनमध्ये पैसे खर्च करता, तेच पैसे गावातल्या गरिब मुलांच्या शिक्षणासाठी दिले तर त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकेल, असे सांगितले़ अण्णा हजारे यांची प्रेरणा आणि आईचा सल्ला मनात साठवून मी काम करण्यास सुरुवात केली़ म्हणूनच स्वकमाईतले ५० टक्के पैसे गरिब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करीत आहे़पायल मनोत, काष्टी़़़़़़़़़़़़़पायल मुनोत ही स्वयंरोजगारातून मिळालेल्या पैशातून काष्टी येथील कन्या विद्यालयासाठी दिलेली पिण्याच्या पाण्याची टाकी व जलशुद्धिकरण यंत्रणा़