ज्या वयात मुले खेळतात आणि खोड्या करतात, त्या वयात केरळातील कोच्ची येथील या ६ वर्षीय मुलाने लाखो रुपयांची कमाई केली आहे. निहाल राज नावाचा हा मुलगा नेमके करतो तरी काय? निहाल ४ वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याला किचनमधील कामांची आवड आहे. आई काय काय पदार्थ बनविते, हे तो बारकाईने पाहतो. विशेष म्हणजे, यातील अनेक पदार्थ त्याने शिकूनही घेतले आहेत. निहालचे वडील राजगोपाल यांनी सांगितले की, निहाल किचनमध्ये पदार्थ बनवितानाचा एक व्हिडीओ आम्ही सहजच फेसबुकवर पोस्ट केला. त्याला अनेकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. काही मित्रांनी असा सल्ला दिला की, यू ट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड करावा. हा व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केल्यानंतर, एका अॅडव्हर्टाइज एजन्सीने मँगो आइसस्क्रीम बनविणारा हा व्हिडीओ बघितला आणि त्याचे हक्क मागितले. त्या बदल्यात १ लाख ३५ हजार रुपये दिले. या कुटुंबाने यातील काही रक्कम केरळात दान केली आहे.
६ वर्षांच्या मुलाची कमाई लाखोमध्ये, खेळण्या-बागडण्याच्या दिवसांत अनोखा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:20 AM