दिल्ली - अनेक शंका-कुशंका आणि विरोधानंतरही अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) परीक्षांना मंगळवारी प्रारंभ झाला. ६0 टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी सहभागी झाले होते. या परीक्षेसाठी ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १२ पाळ्यांत ६६0 केंद्रांतून सहा दिवस ही परीक्षा होणार आहे.परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की परीक्षेच्या वेळी शारीरिक अंतर आणि कोरोना बचावासाठी केवळ मास्कच नव्हे तर सॅनिटायझरही उपलब्ध करण्यात आले होते. एनटीएचे महाव्यवस्थापक डॉ. विनीत जोशी यांनी देशभरात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडल्याचे सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक म्हणाले की विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये ही सरकारची इच्छा होती. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोयही करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महाव्यवस्थापक डॉ. जोशी म्हणाले ६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत एक लाख १२ हजार विद्यार्थी बसणार आहेत. पहिल्या पाळीत वापरलेले कॉम्प्युटर दुसºया वेळी वापरण्यात आले नाहीत. त्याशिवाय परीक्षा केंद्राबाहेर पडतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची काळजी घेण्यात आली होती.जेईई परीक्षा देशात सर्वत्र अगदी सुरळीत पार पडल्या. त्यासाठी राज्य सरकारे, अधिकारी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांचे सहकार्य लाभले.-अमित खरे, उच्च शिक्षण सचिव
जेईई मुख्य परीक्षेला पहिल्या दिवशी ६0 टक्के विद्यार्थी उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 3:59 AM